भरधाव दुचाकी ट्रकवर आदळल्याने कपिल वस्तीनगरातील दुचाकीस्वार ठार
A speeding motorcycle collided with a truck, killing the motorcyclist from Kapil Vasti Nagar. भुसावळ (14 जानेवारी 2026) : भरधाव दुचाकी ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात कपिल वस्तीनगरातील 33 वर्षीय दुचाकीस्वार ठार झाला तर सहदुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना 13 रोजी सायंकाळी सात वाजता कपिल वस्तीनगर ते दीपनगर हायवे रोडवर घडली. विजय पांडुरंग सुरडकर (33, कपिल वस्तीनगर, भुसावळ) असे मयताचे नाव आहे.
अनियंत्रीत दुचाकी धडकून अपघात
भुसावळ तालुका पोलिसात साजन संजय वानखेडे (19, रा.कपिल वस्तीनगर, ता.भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवार, 13 रोजी सायंकाळी सात वाजता कपिल वस्तीनगर ते दीनगर हायवे रोडवर विजय पांडुरंग सुरडकर (33, कपिल वस्तीनगर, भुसावळ) याने टीव्हीएस कंपनीची रायडर मोटारसायकल ही रस्त्याचे परिस्थीतीकडे दुर्लक्ष करीत चालवली व तोल न सांभाळल्यामुळे पुढे चालणार्या मालट्रकवर ही दुचाकी धडकल्याने दुचाकीस्वार स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरला तसेच फिर्यादीसह साक्षीदाराच्या दुखापतीस व मोटारसायकलच्या नुकसानीस कारणीभुत ठरला. अपघात प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक पूजा संजीवनी अंधारे करीत आहेत.


