जळगाव महापालिकेसाठी शांततेत मतदानाला सुरूवात : आमदार राजूमामा भोळेंनी सहपरिवार बजावला हक्क
Voting begins peacefully for the Jalgaon Municipal Corporation : MLA Rajumama Bhole and his family cast their votes जळगाव (15 जानेवारी 2026) : जळगाव शहर महानगरपालिकेच्या 48 जागांसाठी सार्वत्रिक निवडणुकीला गुरुवार, 15 रोजी शांततेत व सुरळीतरित्या प्रारंभ झाला आहे. जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी गुरुवारी सकाळी सहपरिवार मतदानाचा हक्क बजावून नागरिकांना मतदानाचे आवाहन केले.
आमदार राजूमामा भोळे यांनी शहरातील प्रभाग क्रमांक 7 अंतर्गत असलेल्या रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूल येथे जाऊन मतदान केले. यावेळी त्यांच्यासोबत माजी महापौर सीमाताई भोळे, महायुतीकडून बिनविरोध निश्चित झालेले उमेदवार विशाल भोळे तसेच कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

लोकशाहीच्या सणात प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी आमदार भोळे यांनी केले. सकाळपासूनच विविध मतदान केंद्रांवर मतदारांची रांग दिसून आली.

