30 वर्षानंतर संतोष चौधरींचे कम बॅक : भुसावळ पालिकेत बोगस कामांना आता थारा नाहीच ! शहराचा चेहरा-मोहरा बदलवणार


गणेश वाघ
Santosh Chaudhary’s comeback after 30 years: No more room for fraudulent work in the Bhusawal municipality! He will transform the face of the city भुसावळ (15 जानेवारी 2026) : भुसावळ पालिकेत आता कुठल्याही प्रकारच्या बोगस कामांना थारा दिला जाणार नाही. सर्वधर्म समभाव जोपासत शहरात शांतता नांदावी व व्यापार वाढून शहराचा विकास व्हायला हवा या उद्देशाने आपले यापुढे कार्य असेल, अशी ग्वाही माजी आमदार संतोष चौधरी यांनी दिली. प्रांताधिकारी कार्यालयात स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तब्बल 30 वर्षानंतर चौधरींची आता पालिकेत इंट्री झाल्याने आगामी काळात शहराचे राजकारण रंजक वळणावर पहायला मिळार आहे.

30 वर्षानंतर चौधरींचे पालिकेत ‘कम बॅक’
माजी आमदार संतोष चौधरी 24 नोव्हेंबर 1991 रोजी पहिल्यांदा पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले व त्यानंतर त्यांनी विजयाची घौडदौड कायम राखत 1996 व 2001 मध्ये नगरसेवक होण्याचा (सलग तीन टर्म) बहुमान पटकावला. त्यानंतर 1994 मध्ये त्यांनाप उपनगराध्यक्षपदाची संधी मिळाली व 4 ऑगस्ट 1998 रोजी ते पालिकेत नगराध्यक्ष बनले. त्यानंतर चौधरींच्या ताब्यातून पालिका गेली मात्र गायत्री भंगाळे यांच्या निमित्ताने पुन्हा चौधरींच्या ताब्यात पालिका आली असून 30 वर्षानंतर चौधरींचे पालिकेत कमबॅक झाले आहे.

शहराचा चेहरा-मोहरा बदलवणार
माजी आमदार चौधरी म्हणाले की, नूतन उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे यांचे आपण अभिनंदन करतो. आता शहरात चांगल्या दर्जाचा विकास व्हायला हवा या पद्धत्तीने काम करण्यात येईल शिवाय नगरपालिका प्रशासन वेळेवर व चांगले काम करेल असा आम्हाला विश्वास आहे. जनतेने आम्हाला कौल दिल्याने निश्चितपणे समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. कोणत्याही बोगस कामांना वा बिलांना पालिकेत आता थारा दिला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.

26 जानेवारीला पालिकेचे स्थलांतर
‘अनेकतेत एकता भुसावळची विशेषता’ या आशयाचे बोधचिन्ह असलेली प्रतिमा यावेळी नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी माजी आमदार चौधरींना देत त्यांचा निवडीबद्दल सत्कार केला. यावेळी चौधरी यांनी कोंडवाड्यात असलेल्या पालिकेचे सोेमवार, 26 जानेवारीला नगरपालिकेच्या रुग्णालयात स्थलांतरीत होत असल्याची माहिती दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !