यावल शहरातील हॉटेलमध्ये एकावर प्राणघातक हल्ला : दोघांविरुद्ध गुन्हा दाखल


A man was fatally attacked at a hotel in Yawal city: a case has been registered against two individuals. यावल (15 जानेवारी 2026) : यावल शहरातील फैजपूर रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये अट्रावल येथील एका 45 वर्षीय इसमावर दोघांनी अनैतिक संबधाच्या वादातून थेट प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात सदर इसम हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात बुधवारी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले यावल शहरात ?
शहरातील फैजपूर रस्त्यावर हॉटेल भाग्यश्री आहे. या हॉटेलमध्ये अट्रावल, ता.यावल या गावातील महादेव वाडी भागातील रहिवासी राजेंद्र विठ्ठल लोहार (45) हे सोमवारी रात्री जेवण पार्सल घेण्यासाठी आले होते. दरम्यान तेथे दारू पीत बसलेल्या खुशाल उर्फ बंटी गजानन बोरसे (भुसावळ) व प्रसाद सुकलाल सूर्यवंशी (रा.यावल) या दोघांनी त्याला बोलावले व राजेंद्र लोहार यांचे चुलत भाऊ गिरीश लोहार यांच्यासोबत एका महिलेच्या असलेल्या अनैतिक संबंधावरून वाद झाला आणि या वादातून या दोघांनी त्याला शिवीगाळ करून मारहाण केली तसेच त्याच्या डोक्यात दारूच्या बॉटल आणि तीष्ण हत्याराने त्याच्या दोन्ही गालावर जबर कापून दुखापत केली व त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी राजेंद्र लोहार यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एम.जे. शेख करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !