भुसावळातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयाचे रासेयो हिवाळी शिबिर उत्साहात
भुसावळ (15 जानेवारी 2026) : भुसावळ शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष हिवाळी शिबिर राजोरा, ता.यावल येथे नुकतेच उत्साहात झाले.
यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी भोळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक होते. प्रमुख पाहुणे म्हणून राजोरा सरपंच.पुष्पा गिरीधर पाटील होत्या. आपल्या मनोगतात सरपंच पुष्पा पाटील यांनी शिबिर कालावधीत श्रमदानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे तसेच शिबिर काळातील विद्यार्थ्यांच्या शिस्तपूर्ण वागणुकीचे कौतुक केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्यात झालेल्या सकारात्मक बदलाची जाणीव करुन दिली आणि विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून समाज सेवा व देशसेवा केली तर नक्कीच तुमची प्रगती होईल त्यासोबतच आई-वडिलांचीही मान ऊंचावेल, असे आवाहन केले. ग्रामविकास अधिकारी सुरज सोनवणे, दिनेश सिताराम पाटील, गिरधर काशिनाथ पाटील, रविंद्र प्रकाश पाटील या सर्वांचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिरास मदत केल्याबद्दल आभार व्यक्त केले. जिल्हा परिषद आणि प्राथमिक शाळा, राजोरा येथील मुख्याध्यापक रवींद्र पाटील यांंनी मुलाचे कौतुक करून मुलांना स्व-ची जाणीव करून देत स्वतःची प्रगती कशी करावी हे सांगितले.
शिबिराच्या समारोप समारंभाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक्षा वाघ तर प्रास्ताविक प्रा.डॉ.जे.बी.चव्हाण तसेच आभार हर्षल कुर्हाडे याने मानले. यशस्वीतेसाठी राजोरे तालुका यावल येथील सामाजिक कार्यकर्ते मयूर संजय महाजन, डॉ.जे.बी.चव्हाण, डॉ.ए.आर.सावळे, प्रा.श्रेया चौधरी, शिक्षकेतर कर्मचारी प्रकाश चौधरी व राजोरा ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत सदस्यांचे सहकार्य लाभले.

