भुसावळातील भोळे महाविद्यालयामार्फत राष्ट्रीय युवक दिनानिमित एड्स जनजागृती रॅली
भुसावळ (15 जानेवारी 2026) : भुसावळ शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयामार्फत स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त विद्यार्थी विकास समिती अंतर्गत राष्ट्रीय युवक सप्ताह सोमवार, 12 जानेवारी 2026 रोजी दत्तकगाव राजोरा येथे एड्स जनजागृती रॅली काढण्यात आली.
सर्व विद्यार्थी व गावकर्यांना यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ.राजू फालक, क्रीडा संचालक व विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.डॉ.एस.डी.चौधरी, प्रा.डॉ.आर.बी.ढाके, प्रा.डॉ.एस.एस.पाटील, रासेयो अधिकारी प्रा.डॉ.जगदीश चव्हाण, प्रा.डॉ.अनिल सावळे, महिला अधिकारी प्रा.श्रेया चौधरी मयुर महाजन, प्रकाश चौधरी यांनी परिश्रम घेतले.


