पाच दिवस होऊनही हतनूरचे आवर्तन पालिका बंधार्‍यात पोहोचलेच नाही

पाच दिवस होऊनही हतनूरचे आवर्तन पालिका बंधार्‍यात पोहोचलेच नाही


Even after five days, the water released from Hatnur dam has not yet reached the municipal reservoir भुसावळ (17 जानेवारी 2026) : हतनूर धरणातून मोसमातील पहिले आवर्तन सोडण्यात आले. हे आवर्तन पाच दिवस होऊनही शुक्रवारी दुपारपर्यंत पालिकेच्या बंधार्‍यात पोहोचले नसल्याने शहरावर जलसंकट उभे राहण्याची भीती आहे तर दोन दिवसांत आवर्तन बंधार्‍यात न पोहोचल्यास शहरात पाणी कपातीची वेळ येवू शकते, असे सूत्रांनी सांगितले. भुसावळ शहरासह दीपनगर व रेल्वे या विभागासाठी सोमवारी हतनूर धरणातून आवर्तन सोडण्यात आले आहे.

बंधार्‍यातील जलसाठा घटला
शहराला पाणीपुरवठा करणार्‍या पालिकेच्या बंधार्‍यातील जलसाठा कमी झाला आहे. यामुळे प्रशासनाने हतनूर धरणातून आवर्तन मागवले. सोमवारपासून तीन दिवस दररोज एक हजार व दोन दिवस 500 क्सुसेकने विसर्ग करण्यात आला. आवर्तनाचे पाणी बंधार्‍यात शुक्रवारपर्यंत पोहोचेल असा अंदाज होता. पण, शुक्रवारी दुपारपर्यंतही आवर्तन पोहोचले नाही. त्यास अजून दोन दिवसांचा विलंब झाला तर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होऊ शकतो. मात्र, शनिवारी आवर्तन पोहोचणे शक्य आहे.

पाच दिवसानंतरही पाणी पोहोचलेच नाही
पालिका व रेल्वे विभागाने मागणी केल्याने सोमवारी आवर्तन सोडण्यात आले. ते दीपनगर औष्णिक केंद्रातील सुदगाव बंधारा, रेल्वे व भुसावळ पालिकेच्या बंधार्‍यात साठवून पुरवठा केला जाईल. तापी नदीतील रेल्वे व पालिकेच्या बंधार्‍यात हे पाणी अडवून शहराला आगामी 30 ते 35 दिवस पुरवण्याचे नियोजन आहे. पण आवर्तन वेळेत पोहोचले तर दिलासा मिळेल.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !