भुसावळातील इंद्रप्रस्थ नगरात चोरीचा प्रयत्न : नागरिकांमध्ये पसरली भीती
भुसावळ (18 जानेवारी 2026) : शहरातील इंद्रप्रस्थ नगरात शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घातला. एका बंद घराची कडी तोडण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी परिसरातील नागरिकांना जाग आल्याने चोरट्यांनी काढता पाय घेतला.
कडी-कोयंडा तोडलेल्या घरातून चोरट्यांना काहीही मिळाले नाही. चोरट्यांनी घातलेल्या धुमाकुळामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी रात्री या भागात गस्त सक्त ठेवावी, अशी मागणी केली जात आहे.


