भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात दहावीसह बारावीतील विद्यार्थ्यांना निरोप
भुसावळ (18 जानेवारी 2026) : शहरातील के.नारखेडे विद्यालयात शनिवारी सकाळी आठ वाजता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. संस्था सेक्रेटरी पी.व्ही.पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे ऑनररी जॉइंट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे होते.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता अडकमोल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. पी.व्ही.पाटील यांचा परिचय उपशिक्षिका अर्चना खाचणे यांनी दिला. पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष भागवत रामचंद्र पाटील उपस्थित होते. याप्रसंगी इयत्ता दहावी ब चा विद्यार्थी संम्यक ईखारे यास सेलिब्रेशन ऑफ कलर्स हे राष्ट्रीय स्तरावरील सुवर्णपदक प्राप्त झाल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर दहावीची विद्यार्थिनी पौरवी गरुडे तसेच बारावी सायन्सची विद्यार्थिनी रिद्धी बाविस्कर यांनी शिक्षकांविषयी कृतज्ञता म्हणून विद्यार्थी मनोगत व्यक्त केले.

शिक्षकांनी केले मार्गदर्शन
बारावी सायन्सची विद्यार्थिनी रूपाली पाटील हिने स्वरचित निरोप ही कविता सादर केली तसेच शिक्षक प्रतिनिधी मनोगत विद्यालयाच्या उपशिक्षिका शुभांगी पाटील यांनी व्यक्त केले. संगणक विभागाच्या शिक्षिका सारीका भारंबे यांनी इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन केले. विद्यालयातील उपशिक्षक एस.डी.वासकर यांनी बोर्ड परीक्षेसंदर्भात अत्यंत महत्त्वाच्या सूचना विद्यार्थ्यांना दिल्या.
दहावी-बारावीचे शिक्षण हा जीवनाचा पाया : पी.व्ही.पाटील
उपशिक्षक सुरेश कापसे यांनी परीक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले उपशिक्षक एन.जे.खाचणे यांनी कॉपी मुक्त परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शपथ दिली. पी.व्ही.पाटील यांनी इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण हा जीवनाचा पाया असतो व हा पाया मजबूत करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन केले.
उपस्थितांचे आभार ज्येष्ठ शिक्षक बी.बी.जोगी यांनी मानले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता अडकमोल, पर्यवेक्षक एस.एल. राणे, संगणक विभागप्रमुख बी.ए.पाटील, विद्यालयाचे व संगणक विभागाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी नितीन पाटील, संदीप पाटील, एस.एम.चिपळूणकर, कांचन राणे, विशाल राणे यांनी परिश्रम घेतले.

