!-- afp header code starts here -->

मालेगाव-मनमाड महामार्गावर भीषण अपघातात चौघे जागीच ठार


मालेगाव (19 जानेवारी 2026) : खाजगी ट्रॅव्हल्ससह समोरून येणार्‍या पिकअप वाहनात जोरधार धडक झाल्याने भीषण अपघातात चौघे जागीच ठार झाले. हा अपघात मालेगाव-मनमाड महामार्गावर सोमवारी घडला. या दुर्घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे जण गंभीर जखमी तर 20 पेक्षा अधिक प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात मालेगाव तालुक्यातील वर्‍हाणे गावाजवळ पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडला.

अपघातानंतर गोंधळ
पुण्याकडून मालेगावच्या दिशेने येणारी एक खासगी ट्रॅव्हल्स आणि समोरून येणार्‍या पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की, पिकअप वाहन थेट ट्रॅव्हल्समध्ये घुसली आणि बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले.

या अपघातात चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय ट्रॅव्हल्समधील 20 हून अधिक प्रवासी किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस व स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य राबवण्यात आले.

जखमींना मालेगाव सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. या भीषण अपघातामुळे मालेगाव-मनमाड मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.

 


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !