बोगस दिव्यांग प्रमाणपत्र : जळगाव जिल्हा परिषदेतील पाच कर्मचारी निलंबित
Bogus disability certificates: Five employees of Jalgaon Zilla Parishad suspended जळगाव (22 जानेवारी 2026) : राज्याच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या आदेशानुसार राज्यातील दिव्यांग कर्मचारी व दिव्यांग व्यक्तींच्या दिव्यांग प्रमाणपत्राची तपासणी मोहिम हाती घेण्यात आली आहे. या तपासणीत जळगाव जिल्हा परिषदेच्या पाच कर्मचार्यांची निकषानुसार टक्केवारीत तफावत आढळून आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी पाचही कर्मचार्याविरुद्ध बुधवार, 21 जानेवारी रोजी निलंबनाची कारवाई केल्याने खळबळ उडाली.
यापूर्वी आठ कर्मचार्यांवर कारवाई
यापूर्वी देखील आठ कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली त्यामुळे आतापर्यंत निलंबित करण्यात आलेल्या कर्मचारी यांची संख्या 13 इतकी झाली आहे.




राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागामार्फत दिव्यांग कर्मचारी यांची युआयडी कार्ड तपासणी मोहिम हाती घेण्यात आली आहे. यात जळगाव जिल्हा परिषदेच्या विविध आस्थापनावर कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांची देखील तपासणी करण्यात येत आहे. या तपासणी दरम्यान दिव्यांग टक्केवारी तफावत आढळून आलेल्या कर्मचार्याविरुध्द निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात येत आहे.
त्यानुसार भास्कर रामदास चिमणकर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी यावल, विनोद शांताराम बोधरे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी पंचायत समिती चोपडा, शांताराम उखरडू तायडे, वरिष्ठ सहाय्यक पंचायत समिती यावल,दिनेश लक्ष्मण नन्नवरे कनिष्ठ सहाय्यक ग्रामपंचायत विभाग,पारसमणी काशीराम मोर, कनिष्ठ सहाय्यक पंचायत समिती अमळनेर या पाच कर्मचार्यावर निलंबनाची कारवाई बुधवार, 21 जानेवारी रोजी करण्यात आली.