बिहारींवर टीका कशाला ? काम करण्याची आपल्यातच मानसिकता नाही ! पालकमंत्री गुलाबराव पाटील


Why criticize Biharis? We ourselves lack the mindset to work! Guardian Minister Gulabrao Patil जळगाव (25 जानेवारी 2026) : आपण बिहारींवर टीका करतो, कशाला टीका करतो मग. काम आहे, कोण म्हणतं काम नाही. मात्र काम करण्याची मानसिकता आजच्या तरुणांमध्ये नाही. तरुणांना राग आला तर आला. कारण आता चार वर्षांनी निवडणुका आहेत. तेंव्हाचं तेव्हा बघू. अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपलं परखड मत व्यक्त केले आहे.

नोकर्‍या पाहिजे, नोकर्‍या पाहिजे मात्र नोकर्‍या आहेत मात्र नोकर्‍या करणारी मानसिकता असलेले माणसे नाहीत. बिहारी माणूस या ठिकाणी पोट भरतो आणि आपण नुसत्या गोष्टी ऐकतो अंबानी असा होता तसा होता, त्यांनी पण शून्यापासून सुरुवात केली. तुम्हाला काय अडचण आहे? तुम्ही पण प्रयत्न करून बघा ना, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिलाय. जळगाव जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने जळगावात उद्योजकांची कार्यशाळा पार पडली. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या अनोख्या स्टाईलमध्ये जोरदार फटकेबाजी केली.

आमच्याकडे पाहत तर चला, मी काय उधारी मागायला आलोय का?
मी काय राजकारणी होतो का? मात्र आता आमच्या धंद्यात पण आम्ही श्रेष्ठ आहोत. प्रत्येक गोष्टींमध्ये नैपुण्य दाखवण्याची गरज आहे. जळगावच्या एमआयडीसीला ‘डी प्लस’चा दर्जा मिळावा यासाठी सात वर्षे लढलो. सर्वांनी त्यासाठी प्रयत्न केले. त्यावेळी आमचे उद्योग मंत्री देसाई होते. ते लक्ष देत नव्हते. माझ्याकडे बघायचे सुद्धा नाही. एक दिवशी त्यांना पक्षाच्या बैठकीत डायरेक्ट बोललो की, आमच्याकडे पाहत तर चला. मी काही तुमच्याकडे उधारी मागायला नाही आलोय. स्पष्ट वक्ता भव मात्र मी जिल्ह्याकरता मागत होतो मात्र तरीही आमचं काम नाही केलं त्यांनी. शेवटी हा विषय कॅबिनेटमध्ये मंजूर झाला. त्यावरून बैठकीत खूप वेळ भनका-भनकी देखील झाली. आमच्या आजूबाजूला सर्व जिल्ह्यांना एमआयडीसीमध्ये दर्जा होता. मग आम्हाला का नाही? आम्ही का दुसर्‍याचे लेकरं होतो का या शब्दात बोललो. असा किस्सा मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितला.

पोषण आहारात केळीचा समावेश करा
अकराचे अकरा आमदार तुमच्या पक्षाचे निवडून द्यायचे. सरकार आमच्यामुळे बसायचे आणि आम्हाला लांब ठेवायचे का? अशाप्रकारे शेवटी सरकारने दर्जा दिला. शेवटी आम्हाला जशी त्यांची गरज असते, तशी आमचे देखील त्यांना गरज असते. छोटे छोटे उद्योग आले तरच इतर उद्योग मोठे होतील. त्यामुळे आपल्या जळगाव जिल्ह्यातल्या केळीवर आधारित देखील उद्योगांची मोठी गरज आहे. राज्यातल्या सर्व अंगणवाड्यांमधील पोषण आहारात केळीचा समावेश करा, याबद्दलची मागणी मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे देखील यावेळी गुलाबराव पाटील यांनी सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !