विठ्ठलाच्या दर्शनाहून परतणार्या भाविकांच्या वाहनाला अपघात : चौघे ठार
Accident involving a vehicle carrying devotees returning from visiting Vitthal’s temple : Four killed सोलापूर (27 जानेवारी 2026) : विठ्ठलाच्या दर्शनाहून परतणार्या डाेंंबिवलीतील भाविकांच्या वाहनाता अपघात झाल्याने चार भाविकांचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवेढा-पंढरपूर रोडवरील शरद नगराजवळ सोमवारी रात्री घडला
कंटेनर व क्रुझरमध्ये अपघात
कंटेनर आणि क्रुझरची समोरासमोर झालेल्या भीषण धडकेमध्ये चार भाविकांचा मृत्यू झाला असून पाच भाविक गंभीर जखमी झाले आहेत. तुळजापूर आणि अक्कलकोट देवदर्शन करून येणार्या क्रुझरमधील भाविकांच्या गाडीला कंटेनरने दिलेल्या धडकेमुळे हा भीषण अपघात झालाय. अपघातातील सर्व भाविक डोंबिवली येथील असून सलगच्या सुट्टीमुळे देवदर्शन उरकून ते परत पंढरपूर रेल्वे स्टेशनकडे परतीच्या प्रवासासाठी निघाले होते. रात्रीच्या वेळी अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज आहे. अपघातातील जखमींना सोलापूर, मंगळवेढा आणि पंढरपूर या तीन ठिकाणी उपचारासाठी हलविण्यात आले आहे.








