!-- afp header code starts here -->

भुसावळ तालुका हादरला : साकरीतील दोघा अल्पवयीन मुलींना विहिरीत ढकलले


Bhusawal taluka shaken: Two minor girls pushed into a well in Sakri भुसावळ (27 जानेवारी 2026) : भुसावळ तालुक्यातील साकरी येथे नववीत शिकणार्‍या दोन अल्पवयीन विद्यार्थिनींना गावातीलच तरुणाने विहिरीत ढकलल्याची धक्कादायक घटना मंगळवार, 27 रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमागील कारणांचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे. लक्ष्मी अभय महाजन (15, रा.गायत्री मंदिराजवळ, साकरी) व नाव्या विजय चौधरी (15, रा. विठ्ठल मंदिराजवळ, साक्री) अशी मृतांची नावे आहेत. घटनेप्रकरणी गावातीच दोन तरुणांना तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

काय घडले साकरीत?
भुसावळ तालुक्यातील साकरी गावापासून काही अंतरावरील सोपान फेगडे यांच्या विहिरीतील शेतात दोन अल्पवयींन मुलींचे मृतदेह आढळल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. दोन्ही अल्पवयीन तरुणी या साकरी गावातील रहिवासी असून जनता विद्यालयात शिक्षण घेत असल्याची माहिती आहे.

घटनेचे कारण गुलदस्त्यात!
गावातील तरुणाने कुठल्यातरी कारणातून या मुलींना विहिरीत ढकलून दिल्याचा पोलिसांना संशय आहे. घटनेची माहिती मिळताच प्रभारी उपअधीक्षक नितीन गणापुरे, तालुका निरीक्षक महेश गायकवाड व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. एका अल्पवयीनाचा मृतदेह हाती लागल्याची माहिती असून दुसर्‍या पाण्यात बेपत्ता झालेल्या अल्पवयीनाला शोधण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. संशयीत तरुणाला पोलिसांनी चौकशीकामी ताब्यात घेतले आहे. या घटनेने गावात मोठी खळबळ उडाली आहे.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !