!-- afp header code starts here -->

बारामतीत विमान लॅण्डींगदरम्यान दुर्घटना : अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू !


Plane crash during landing in Baramati: Six people, including Ajit Pawar, have died पुणे (28 जानेवारी 2026) : बारामती येथील विमानतळावर लँडिंगदरम्यान दुर्घटना घडल्याने विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 6 सणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

दौर्‍यावर असतानाच अपघात
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार बुधवारी बारामती दौर्‍यावर होते. आज दिवसभरात त्यांच्या चार महत्त्वाच्या सभा नियोजित होत्या. याचसाठी ते सकाळी विमानाने बारामतीला पोहोचले मात्र विमानतळावर लँडिंग करत असतानाच हा विमानाचा अपघात झाला.

यावेळी विमानामध्ये अजित पवार यांच्यासोबत त्यांचे पीए आणि इतर सहकारी होते. त्यांचाही या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

लॅण्डींगदरम्यान विमान क्रॅश
सूत्रांच्या माहितीनुसार, विमानाचे बारामती येथे अपघातग्रस्त लँडिंग झाले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पीएसओ, सेवक तसेच दोनचालक दलाच्या सदस्यांसह (पायलट इन कमांड + फर्स्ट ऑफिसर) विमानात होते. या सर्व जणांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे.

पदाधिकार्‍यांची धाव : राज्यावर शोककळा
भीषण विमान अपघातात अजितदादांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आल्याने कार्यकर्त्यांसह महाराष्ट्राला मोठा धक्का बसला. बारामती विमानतळाजवळील शेतात त्यांचे विमान कोसळले. विमानाला भीषण आग लागली. बुधवारी अजितदादांच्या चार सभा होत्या. त्यासाठी ते येत होते.

दरम्यान, हे विमान विमानतळाजवळील शेतात कोसळले. त्यावेळी लोकांनी मदतीसाठी धाव घेतली. यंत्रणा ही धावल्या. पण अपघात अत्यंत भीषण होता. मुंबईवरून ते बारामतीसाठी निघाले होते. या विमान अपघाताने पवार कुटुंबियावर शोककळा पसरली तर राज्यालाही मोठा धक्का बसला. कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांनी तातडीने बारामतीकडे धाव घेतली असून याठिकाणी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे. एक दिलखुलास, रोखठोक नेता राज्याने गमावला आहे.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !