वाळूचे ट्रॅक्टर सोडण्याच्या मोबदल्यात 30 हजारांची लाच : उत्राणचे तलाठी जळगाव एसीबीच्या जाळ्यात
आरोपींच्या ताब्यातून महागड्या मद्यासह एक लाख 73 हजारांची रोकड जप्त
गणेश वाघ
Two talathis from Utran were caught by the Jalgaon ACB while accepting a bribe of Rs. 30000. भुसावळ (28 जानेवारी 2026) : वाळूचे ट्रॅक्टर सोडण्याच्या मोबदल्यात 30 हजारांची लाच मागून ती ग्रामपंचायत कार्यालयात स्वीकारताना उत्राण, ता.एरंडोल येथील दोघा तलाठ्यांना जळगाव एसीबीने अटक मंगळवार, 27 रोजी सायंकाळी अटक केली. या कारवाईने महसूल वर्तुळातील लाचखोर हादरले आहेत. उत्राण सजा अहिर हद्द तलाठी नरेश भास्कर शिरुड (41, वाघनगर, जळगाव) व उत्राण तलाठी सजा गुजर हद्द शिवाजी एकनाथ घोलप (46, हरिओम नगर, नाशिक, मूळ रा.पहूर पेठ, ता.जामनेर) अशी अटकेतील तलाठ्यांची नावे आहेत.
असे आहेे लाच प्रकरण
तक्रारदार वाळू वाहतूक करतात व त्यांचे वाळूने भरलेले ट्रॅक्टर उत्राणच्या गिरणा नदीपात्रात मंगळवार, 27 जानेवारी रोजी तलाठी नरेश भास्कर शिरुड यांनी पकडल्यानंतर कारवाई न करण्यासाठी 25 हजारांची लाच मागितली होती मात्र तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी जळगाव एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर लाच पडताळणी करण्यात आली. शिरुड यांनी इतरांकडून जास्त पैसे घेतो मात्र तू गरीब असल्याने 30 हजार रुपये दे, असे सांगून लाच मागितल्यानंतर सापळा रचण्यात आला. यावेळी तलाठी शिवाजी घोलप यांनी लाच मागणीला प्रोत्साहन दिले तर ग्रामपंचायत कार्यालयातील एका खोलीत आरोपींनी लाच घेताना त्यांना मंगळवारी सायंकाळी अटक करण्यात आली.आरोपींच्या ताब्यातून घबाड जप्त
आरोपी नरेश शिरुड याच्या ताब्यातून कारवाईप्रसंगी एक लाख 73 हजार 300 रुपयांची रोकड तसेच दोन हजार 950 रुपये किंमतीचे महागडे मद्य व ओप्पो कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला.यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे डॅशिंग पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृवात हा सापळा पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलिस निरीक्षक हेमंत नागरे, अंमलदार प्रदीप पोळ, अमोल सूर्यवंशी, सचिन चाटे आदींच्या पथकाने यशस्वी केला.