!-- afp header code starts here -->

दमदार आणि दिलदार मित्र सोडून गेल्याचे दुःख : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


The sorrow of losing a strong and generous friend: Chief Minister Devendra Fadnavis मुंबई (28 जानेवारी 2026) : कोणत्याही परिस्थितीमध्ये न डगमगता पुढे जाणारे व्यक्तिमत्व म्हणजे अजित पवार ् महाराष्ट्राकरता आजचा दिवस अतिशय कठीण दिवस आहे. अशा प्रकारचे नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्षे लागतात. दमदार व दिलदार मित्र आपल्याला सोडून गेल्याचे दुःख असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

कुटूंबावरही मोठा आघात
महाराष्ट्राच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान अजित पवार देत होते. अशा काळामध्ये त्यांचे निघून जाणे हे अविश्वसनीय आहे. मनाला चटका लावणारे आहे. व्यक्तीगत माझ्याकरता एक दमदार आणि दिलदार अशा प्रकारचा मित्र मला सोडून गेलेला आहे. त्यांच्या कुटुंबावर देखील हा प्रचंड मोठा आघात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आम्ही सर्व लवकरच बारामतीकडे रवाना होत आहे. सकाळपासूनच मी सर्वांच्या संपर्कात आहे. माननीय प्रधानमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री सर्वांशी चर्चा करून त्यांनाही घडलेल्या सर्व परिस्थितीची कल्पना दिलेली आहे. त्यांनी याबद्दल प्रचंड दुःख व्यक्त केलेले आहे.

राज्यात तीन दिवसाचा दुखावटा जाहीर
संपूर्ण देशातच या सर्व प्रकरणामुळे हळहळ पसरली आहे. अजित पवार यांच्या कुटुंबाशी चर्चा करून पुढच्या सर्व गोष्टी ठरविण्यात येतील. सकाळी सुप्रिया सुळे यांच्याशी बोलणं झालं आहे तसेच पार्थ पवार यांच्याशी देखील चर्चा झाली आहे. संपूर्ण पवार कुटुंब बारामतीला पोहोचल्यानंतर त्यांच्या संमतीने पुढचे निर्णय घेतले जातील. बारामतीमध्ये शासकीय सुट्टी घोषित करण्यात आली तसेच राज्यात तीन दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आलेला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विश्वास ठेवायलाच मन तयारच नाही
कधीही भरून न निघणारे नुकसान महाराष्ट्राचे झाले आहे. अशा प्रकारचे लोकनेते गेल्यानंतर जी पोकळी निर्माण होते, ती भरुण काढणे कठीण आहे. अतिशय संघर्षाच्या काळात आम्ही सोबत काम केलेले आहे. या गोष्टीवर विश्वास ठेवायलाच मन तयारच होत नसल्याचेही फडणवीस यांनी म्हटले.

 


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !