!-- afp header code starts here -->

उपमुख्यमंत्री अजितदादांच्या पार्थिवावर उद्या विद्या प्रतिष्ठानमध्ये अंत्यसंस्कार

घड्याळानेच पटवली अखेरची ओळख : राज्यात तीन दिवस राष्ट्रीय दुखवटा


Deputy Chief Minister Ajitdada’s last rites will be performed tomorrow at Vidya Pratishthan बारामती (28 जानेवारी 2026) : विमान लॅण्डींग करताना कॅ्रश झाल्याने अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. अजितदादांच्या अपघाती निधनाने राज्यावर शोककळा पसरली आहे. महाराष्ट्र सामान्य प्रशासन विभाग (प्रोटोकॉल) नुसार, उद्या गुरुवार, 29 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार असून राज्यात तीन दिवस राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. बा

उद्या विद्या प्रतिष्ठानमध्ये अंत्यसंस्कार
बुधवारी अजित पवार यांचे पार्थिव बारामती वैद्यकीय महाविद्यालयात ठेवण्यात आले होते. तिथं अभूतपूर्व गर्दी झाल्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास अजित पवार यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानमध्ये आणण्यात आले. उद्या गुरुवारी सकाळी 6 ते 9 त्यांच्या मुळगावी काटेवाडी इथं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी अकरा वाजता विद्या प्रतिष्ठानमध्ये अंत्यसंस्कार होतील, असे सूत्रांनी सांगितले.

अपघातात पाच जणांचा मृत्यू
बारामती येथील विमान अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्यासह त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव, फ्लाईट असिस्टंट पिंकी माळी, कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक अपघातात मृत्यूमुखी पडले. दिल्लीस्थित व्हीएसआर व्हेंचर्सद्वारे चालवले जाणारे लिअरजेट 45 विमान बुधवारी सकाळी 8.10 वाजता मुंबईहून उड्डाण केले आणि सकाळी 8.45 वाजता रडारशी संपर्क तुटला व बारामतीजवळ शेतात विमान कोसळल्याने स्फोट होवून पाच जणांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्या मृतदेहाची ओळख त्यांच्या घड्याळावरून पटली.

‘घड्याळानेच’ दिली शेवटची ओळख
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते म्हणून ओळख असणारे अजित पवारांसह पाच जणांचे मृतदेह अत्यंत जळालेल्या अवस्थेत आढळले. अजित पवार यांच्या मृतदेहाची ओळख त्यांच्या मनगटावरील घड्याळामुळे पटली. राजकीय जीवनात ‘घड्याळ’ हेच चिन्ह घेऊन अजित पवारांचा संपूर्ण प्रवास झाला आणि त्याच घड्याळाने त्यांच्या आयुष्याची शेवटची ओळख पटवणे, हा नियतीचा अत्यंत क्रूर खेळ असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !