महिला प्रवाशाची पर्स चोरी : नागपूरच्या चोरट्या महिलांना अटक


Woman passenger’s purse stolen: Female thieves from Nagpur arrested भुसावळ (30 जानेवारी 2026) : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येत असलेल्या ऑपरेशन यात्री सुरक्षा अंतर्गत भुसावळ रेल्वे स्थानकावर आरपीएफने महिला प्रवाशाची पर्स चोरी करणार्‍या दोन महिलांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी जीआरपी पोलिसांकडे सोपविले आहे.

काय घडले जंक्शन स्थानकावर ?
आरपीएफच्या सूत्रांनी सांगितले की, 10 जानेवारी 2026 रोजी गाडी 11039 महाराष्ट्र एक्सप्रेसच्या जनरल डब्यात गर्दीचा फायदा घेत एका महिला प्रवाशाच्या पर्समधून छोटी पर्स चोरी झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी मिळालेल्या माहितीवर आरपीएफने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता दोन संशयित महिला चोरी करताना आढळून आल्या. या महिलांचा शोध सुरू होता.

28 जानेवारी रोजी सकाळी सुमारे 10.45 वाजता भुसावळ स्थानकावरील प्लॅटफॉर्म पाचवर पूर्वेकडे त्या दोन्ही महिला संशयित असल्याची मिळताच आरपीएफच्या सीपीडीएस पथकाने तत्काळ घेराव घालून दोघींना ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या महिलांनी आपली नावे उषा सुरेश कांबळे (वय 50) व अंगूर शेखर नाडे (वय 52, दोन्ही राहणार नागपूर) असल्याचे सांगितले. चौकशीत त्यांनी 10 जानेवारी रोजी भुसावळ स्थानकावर महाराष्ट्र एक्सप्रेसच्या जनरल डब्यात चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केलेल्या पर्समध्ये सुमारे 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टॉप्स, सहा ग्रॅम वजनाचा सोन्याचे पेंडल तसेच 10 हजार रुपये रोख असा एकूण अंदाजे 92 हजार रुपयांचा मुद्देमाल होता. यावेळी दोन्ही महिलांना लोहमार्ग पोलिसांकडे सोपवण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !