भुसावळातील बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये उद्या वार्षिक क्रीडा, पारितोषिक वितरण सोहळा


The annual sports and prize distribution ceremony will be held tomorrow at Biyani Military School in Bhusawal भुसावळ (30 जानेवारी 2026) : शहरातील बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये शनिवार, 31 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता वार्षिक क्रीडा स्पर्धा व पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी असतील. प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल अभय एस. मुखर्जी, लेफ्टनंट कर्नल संदीप सिंग, (एसआयसी, 118 टीए बटालियन, भुसावळ) तसेच डीवायएसपी केदार बारबोले यांची उपस्थिती असेल.

या कार्यक्रमात वर्षभरात विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमास पालक,माजी विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य डी.एम.पाटील व सचिव डॉ.संगीता बियाणी यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !