भुसावळ विभागातील चार एक्स्प्रेस गाड्यांच्या मार्गात बदल

काजीपेट-बल्हारशाह तिसर्‍या रेल्वे लाईनचे काम : मंदागिरीला नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक


The routes of four express trains in the Bhusawal division have been changed भुसावळ (30 जानेवारी 2026) : दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागात काजीपेट-बल्हारशाह तिसरी रेल्वे लाईन प्रकल्पाअंतर्गत मंदागिरी स्थानकावर नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे भुसावळ विभागातून धावणार्‍या चार लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या मार्गात तात्पुरते बदल करण्यात आले असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

चार गाड्यांच्या मार्गात बदल
नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉकमुळे रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. यात गाडी 20803 विशाखापट्टणम-गांधीधाम एक्स्प्रेस ही 5 फेब्रुवारी आणि 12 फेब्रुवारी रोजी विशाखापट्टणम येथून सुटताना विजयनगरम-टिटिलागढ मार्गे गांधीधामकडे धावेल. या कालावधीत सदर गाडी दुव्वाडा-विजयवाडा-बल्हारशाह दरम्यान रद्द राहणार आहे.

गाडी 20804 गांधीधाम-विशाखापट्टणम एक्स्प्रेस ही .1 फेब्रुवारी आणि 8 फेब्रुवारी रोजी गांधीधाम येथून सुटताना विजयनगरम-टिटिलागढ मार्गे विशाखापट्टणम येथे जाईल.या गाडीचा दुव्वाडा-विजयवाडा-बल्हारशाह दरम्यानचा प्रवास रद्द करण्यात आला आहे.

गाडी 20819 पुरी-ओखा एक्स्प्रेस ही 1 आणि 8 फेब्रुवारी रोजी पुरी येथून सुटताना विजयनगरम-टिटिलागढ मार्गे ओखा येथे धावेल.या गाडीचा दुव्वाडा-विजयवाडा-बल्हारशाह दरम्यानचा मार्ग रद्द राहणार आहे. त्याचप्रमाणे गाडी 20820 ओखा-पुरी एक्स्प्रेस ही 4 आणि 11 फेब्रुवारी रोजी ओखा येथून सुटताना विजयनगरम-टिटिलागढ मार्गे पुरी येथे धावेल. या कालावधीत सदर गाडी दुव्वाडा-विजयवाडा-बल्हारशाह दरम्यान रद्द राहील.

पायाभूत सुविधांच्या कामामुळे होणार्‍या तात्पुरत्या गैरसोयीबद्दल प्रवाशांनी रेल्वेला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !