!-- afp header code starts here -->

किनगावात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला


The body of an unidentified man was found in Kingaon यावल (31 जानेवारी 2026) : यावल तालुक्यातील किनगाव येथे अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला आहे. बस स्थानकाजवळ असलेल्या वर्कशॉपमागे मृतदेह आढळला आहे. मयत इसम हा अंदाजे 50 वर्षीय वयोगटातील आहे. अनोळखीचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला असून यावल पोलिसांनी शुक्रवारी ओळख पटवण्याचे आवाहन केले आहे.

काय घडले किनगावात?
किनगावातील बस स्थानकाजवळील वर्कशॉपच्या मागे एक अंदाजे 50 वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला. अनोळखी इसम हा यापूर्वी या भागात दिसलेला नव्हता. याप्रकरणी यावल पोलिसांना माहिती देण्यात आली व मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. यावल पोलिसांनी या मयत इसमाची ओळख पटवण्याचे आवाहन केले. तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अजयकुमार वाढवे, पोलिस नाईक किशोर परदेशी करीत आहे.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !