!-- afp header code starts here -->

स्व.अजितदादांनी दिलेला कानमंत्र आयुष्यभर स्मरणात राहील : आमदार अमोल जावळे


The advice given by the late Ajitdada will be remembered for a lifetime : MLA Amol Jawale रावेर (31 जानेवारी 2026) : अजितदादांचे अशा अपघातात जाणे आजही मनाला पटत नाही. स्पष्टवक्ते, निर्भीड आणि निर्मळ असा एक कर्तृत्ववान नेता आपण गमावला आहे. स्व.हरिभाऊ जावळे आणि अजितदादांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. मला त्यांनी कायम कामाच्या गुणवत्तेबाबत मार्गदर्शन केले. ‘कोणतेही काम करताना गुणवत्तेशी तडजोड करू नकोस. विकास कसा असतो, कामांची गुणवत्ता कशी असावी, हे मी तुला बारामतीत दाखवतो,’ असे ते नेहमी सांगायचे. सत्ता ही जनसेवेसाठी कशी वापरावी, याबाबत त्यांनी दिलेले मोलाचे सल्ले आणि कानमंत्र कायम स्मरणात राहतील, असे आमदार अमोल जावळे यांनी भावपूर्ण शब्दांत श्रद्धांजली अर्पण करताना सांगितले.

यांची होती उपस्थिती
स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले असून, रावेर येथे आयोजित सर्वपक्षीय शोकसभेत ते बोलत होते. या शोकसभेला माजी आमदार शिरीष चौधरी, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक पद्माकर महाजन, सुरेश धनके, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक दारा मोहम्मद जफर मोहम्मद, उपनगराध्यक्ष आशिफ मोहम्मद, बाजार समितीचे संचालक डॉ. राजेंद्र पाटील, वसंत महाजन, योगीराज पाटील, सोपान साहेबराव पाटील, रमेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष योगेश पाटील, किशोर पाटील, सोपान पाटील, प्रल्हाद महाजन, हरिष शेठ गणवाणी, नगरसेवक पिंटू वाघ, छोटू बिरपन, शहिद, रविंद्र पवार, दिलीप कांबळे, नगरसेवक राजेंद्र चौधरी, वासू नरवाडे, डॉ. सुरेश पाटील, राजीव पाटील, सिताराम महाजन, यशवंत धनके, लक्ष्मण मोपारी, गणेश चौधरी, केर्‍हाळा येथील प्रकाश पाटील, पंचायत समितीच्या माजी सदस्य योगिता वानखेडे, पांडुरंग पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यांनीही व्यक्त केल्या भावना
यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी, उपनगराध्यक्ष आशिफ मोहम्मद, नगरसेवक पद्माकर महाजन, योगीराज पाटील व राजीव पाटील यांनीही स्वर्गीय अजित पवार यांच्या सामाजिक, राजकीय व विकासात्मक कार्याचा गौरव करत शोकभावना व्यक्त केल्या. सूत्रसंचालन प्रणित महाजन व दीपक पाटील यांनी केले.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !