!-- afp header code starts here -->

भुसावळातील भोळे महाविद्यालयात हुतात्मा दिन


Martyrs’ Day at Bhole College in Bhusawal भुसावळ (31 जानेवारी 2026) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे हुतात्मा दिन अर्थात राष्ट्रपिता महात्मा गांधींना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली. दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून आदरांजली वाहण्यात आली.

पवित्र व भावनिक दिवस
प्राचार्य डॉ.राजू फालक म्हणाले की, 30 जानेवारी हा दिवस आपल्या राष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत पवित्र व भावनिक दिवस आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी, एकतेसाठी व मूल्यांसाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या सर्व हुतात्म्यांच्या स्मरणार्थ हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. या दिवशी आपण केवळ इतिहास आठवत नाही, तर कर्तव्याची जाणीवही जागी करतो.

यांची हरोती उपस्थिती
विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.एस.डी.चौधरी, प्रा.डॉ.अंजली पाटील, रासेयो अधिकारी प्रा.डॉ.जगदीश चव्हाण, प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.श्रेया चौधरी, प्रा.डॉ.जयश्री सरोदे, प्रा.निर्मला वानखेडे, प्रा.आर.डी.भोळे, प्रा.एस.एस.पाटील, प्रा.लखीचंद धांडे, प्रा.कामिनी चौधरी, प्रा.गायत्री नेमाडे, प्रा.सुशीला भाटे, प्रा.अश्विनी भाग्यवंत, प्रा.उत्कर्षा पाटील, प्रा.कुंदा पेंढारकर उपस्थित होते.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !