!-- afp header code starts here -->

नफा वसुलीमुळे चांदी लाखाने घसरली तर सोने भावातही झाली घसरण


Due to profit-taking, silver prices fell by lakhs, while gold prices also declined मुंबई (31 जानेवारी 2026) : सोन्यासह चांदीला गेल्या काही दिवसात वाढलेली मागणी पाहता दराचा आलेख प्रचंड उंचावला मात्र नफ्याची वसुली सुरू होताच चांदी लाखाने घसरले तर सोन्याच्या दरातही प्रचंड घसरण झाल्याचे दिसून आल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सोन्या-चांदीच्या बाजारात शुक्रवार, 30 जानेवारी रोजी घसरण दिसून आली. व्यवसाय संपेपर्यंत (रात्री 11.55 वाजता) नफा वसुलीमुळे एमसीएक्सवर चांदी 1,06,092 रुपयांनी (26.53%) घसरली. 1 किलो चांदीचा भाव 2,93,801 रुपयांवर आला. मागील व्यावसायिक सत्रात चांदीचा भाव 3,99,893 रुपयांवर पोहोचला होता.

एमसीएक्सवर सोन्यातही 20,323 रुपयांची (12%) घसरण झाली. 10 ग्रॅम सोने 1,49,080 रुपयांवर आले. मागील व्यावसायिक सत्रात सोने 1,69,403 रुपयांवर होते. याशिवाय, सोने आणि चांदीच्या एढऋ मध्ये शुक्रवारी 23% पर्यंतची घसरण नोंदवली गेली.

सराफा बाजारात शुक्रवारी चांदी 40,638 रुपयांनी आणि सोने 9,545 रुपयांनी स्वस्त झाले आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन नुसार, एक किलो चांदीची किंमत 3,39,350 रुपये प्रति किलोवर आली आहे. तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,65,795 रुपयांवर आला आहे.

 


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !