!-- afp header code starts here -->

जळगावात स्थानकावर सीसीटीव्ही फुटेजद्वारे मोबाईल चोरट्याला बेड्या


A mobile phone thief was apprehended at Jalgaon station with the help of CCTV footage भुसावळ (31 जानेवारी 2026) : जळगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशाचा मोबाईल चोरणार्‍या तरुणाला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पकडण्यात रेल्वे सुरक्षा दलाला यश आले आहे. ही कारवाई ऑपरेशन पॅसेंजर सिक्युरिटी अंतर्गत करण्यात आली.

काय घडले जळगावात ?
22 जानेवारी रोजी जळगाव रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर नवजीवन एक्सप्रेसच्या जनरल डब्यात चढत असताना एका प्रवाशाच्या खिशातून मोबाईल चोरीस गेला होता.या घटनेची नोंद झाल्यानंतर संशयिताचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची मदत घेण्यात आली. आरपीएफ निरीक्षक अमीतकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफ व जीआरपीच्या संयुक्त पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे संशयिताची ओळख पटवली.

सोमवार, 26 जानेवारी रोजी दुपारी सुमारे 3.25 वाजता जळगाव रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर संशयास्पद हालचाल करत असलेल्या तरुणाला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव हमीद खान (22, रा. मेहरुण, जळगाव) असे सांगितले. त्याच्या झडतीत मोटो कंपनीचा हिरव्या रंगाचा मोबाईल व मोबाईल कव्हरमध्ये 500 रूपये आढळून आले. संशयीताची चौकशी करतांना त्यांने समाधानकारक उत्तर न देत नव्हता,पोलिसी खाक्या दाखविल्यावर अखेर त्याने चोरीची कबुली दिली. यावेळी संशयीताला पुढील कारवाईसाठी जीआरपी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !