यावल शहरातील साने गुरुजी शाळेजवळून मोटरसायकल लंपास


A motorcycle was stolen from near the Sane Guruji School in Yawal town यावल (31 जानेवारी 2026) : शहरातील साने गुरुजी शाळेजवळील रहिवाशाची घराबाहेर लावलेली मोटरसायकल लांबवण्यात आली. या प्रकरणी यावल पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले यावल शहरात ?
शहरात बोरावल गेट परिसरात साने गुरुजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाजवळ निलेश मुरलीधर न्हाळदे राहतात. त्यांनी घराबाहेर दुचाकी (क्रमांक एम.एच.19 बी. एक्स. 1873) ही लावली मात्र चोरट्यांनी संधी मिळताच चोरी केली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर प्रारंभी त्यांनी दुचाकीचा शोध घेतला मात्र यश न आल्यो यावल पोलिसात धावत घेण्यात आली. अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील पाटील करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !