प्रवाशांनो लक्ष द्या : हजरत निजामुद्दीन-वास्को दी गामा एक्सप्रेस आता बर्हाणपूरलाही थांबणार
The Hazrat Nizamuddin-Vasco da Gama Express will now also stop at Burhanpur भुसावळ (31 जानेवारी 2026) : हजरत निजामुद्दीन-वास्को दी गामा (गोवा) एक्सप्रेसला बर्हाणपूर रेल्वे स्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर अतिरिक्त थांबा मिळाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी 12780 हजरत निजामुद्दीन-वास्को दी गामा गोवा एक्सप्रेसला 30 जानेवारीपासून बर्हाणपूर स्थानकावर सकाळी 7.49 वाजता आगमन व 7.50 वाजता प्रस्थान असा दोन मिनिटांचा अतिरिक्त थांबा देण्यात येणार आहे. तसेच, गाडी 12779 वास्को दी गामा-हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेसला दि.29 जानेवारी पासून दुपारी 1.29 वाजता आगमन व 1.31 वाजता प्रस्थान असा दोन मिनिटांचा थांबा असेल.
प्रायोगित तत्वावर थांबा
हा थांबा सध्या प्रायोगिक तत्त्वावर देण्यात आला असून, प्रवाशांचा प्रतिसाद आणि वापर पाहून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.. बर्हाणपूर परिसरातील गोवा, दिल्ली तसेच मध्य भारताकडे प्रवास करणार्या प्रवाशांना या निर्णयाचा थेट फायदा होणार आहे.


