अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी सोन्या-चांदीचे दर घसरले : जाणून घ्या नेमकी बातमी


Gold and silver prices fell before the budget presentation: Find out the complete news. नवी दिल्ली (1 फेब्रुवारी 2026) : अर्थमंत्री निर्मला सीतारमन आज अर्थसंकल्प सादर करीत असून देशाच्या नजरा या अर्थसंकल्पाकडे लागल्या आहेत. अशाच रविवार, 1 रोजी सोन्या-चांदीच्या बाजारात सलग दुसर्‍या दिवशी घसरण झाली आहे. रविवारी सकाळच्या सत्रात मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर चांदी 26 हजार रुपयांनी (9 टक्के) घसरली. एक किलो चांदीचा भाव 2,65,652 रुपयांवर व्यवहार करत आहे.

एमसीएक्सवर सोन्यातही रविवारी सकाळच्या सत्रात 12 हजार रुपयांची (8 टक्के) घसरण झाली आहे. 10 ग्रॅम सोने 1.38 लाख रुपयांवर व्यवहार करत आहे. सोन्या आणि चांदीच्या दरात आज 29 टक्के पर्यंतची घसरण नोंदवली गेली आहे.

दोन दिवसांत सोने 31 हजार आणि चांदी 1.36 लाख स्वस्त
एमसीएक्सवर सोन्याच्या दरात दोन दिवसांत 31 हजार रुपयांची घसरण झाली आहे. 29 जानेवारी रोजी ते 1.69 लाख रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले होते, जे आज 1.38 लाख रुपयांवर व्यवहार करत आहे.

तर, चांदीच्या किमतीत 1.36 लाख रुपयांची घसरण झाली आहे. 29 जानेवारी रोजी ते 4.01 लाख रुपये प्रति किलोच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले होते, जे आज 2.65 लाख रुपयांवर व्यवहार करत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !