मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय : राज्यातील 22 प्रचार सभा रद्द
Chief Minister takes a major decision: 22 election rallies in the state cancelled मुंबई (1 फेब्रुवारी 2026) : विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचे निधन झाले. आपल्या सहकार्याप्रती श्रद्धांजली अर्पण करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा राजकीय निर्णय घेतला आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री स्वतः कोणताही प्रचार करणार नाहीत. अजितदादांच्या सन्मानार्थ त्यांनी आपल्या सर्व 22 प्रचारसभा रद्द केल्या आहेत.
स्थानिक नेत्यांवर टाकली जवाबदारी
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 7 दिवसांत 22 सभांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, अजित पवारांच्या निधनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि वैयक्तिक दुखवटा लक्षात घेता, मुख्यमंत्र्यांनी प्रचारापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. आता या निवडणुकांचा प्रचार स्थानिक नेते आणि पदाधिकारी सांभाळणार आहेत.
निवडणूक वेळापत्रकातही बदल
अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने मतदानाच्या तारखांमध्येही बदल केला आहे. आता 5 फेब्रुवारीऐवजी आता 7 फेब्रुवारी रोजी मतदान होईल. उमेदवारांना 5 फेब्रुवारीपर्यंत प्रचारासाठी वेळ असेल. तर फेब्रुवारी रोजी मतमोजणी पार पडणार आहे.


