अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर : डॉ.केतकी पाटील


The budget focuses on infrastructure: Dr. Ketki Patil जळगाव (1 फेब्रुवारी 2026) :  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी महिलांसाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या आहेत. मागील अर्थसंकल्पात महिलांसाठी लखपती दीदी योजना सुरू करण्यात आली होती. 2026 च्या अर्थसंकल्पात महिलांच्या विकासावर भर देण्यात आला असल्याचे जिल्हा सरचिटणीस डॉ.केतकी पाटील म्हणाल्या.

सुविधांच्या विकासात अधिक गुंतवणूक
डॉ.पाटील म्हणाल्या की, विद्यार्थिनींसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृहांची सुविधा उपलब्ध केली जाईल. प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी रुग्णालय उभारले जाईल. महिलांचे उत्पन्न वाढवण्यासाठी विक्री केंद्रे स्थापन केली जातील. देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत 2026-27 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री सीतारामन यांनी एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची विक्रमी तरतूद केली आहे. यंदाचे बजेट विशेषतः भांडवली खर्च, म्हणजेच नवीन शस्त्रे, उपकरणे आणि प्लॅटफॉर्म खरेदीला हायलाइट करते. ड्रोन, लढाऊ विमाने, आधुनिक तोफखाना, नौदल जहाजे आणि सीमावर्ती भागात पायाभूत सुविधांच्या विकासात अधिक गुंतवणूक करण्याचा सरकारचा मानस दिसून येतो, असेही डॉ. केतकी पाटील म्हणाल्या.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !