एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष : अशोक जैन


From AI to high-value crops the government has made major announcements ; now the focus is on implementation : Ashok Jain जळगाव (1 फेब्रुवारी 2026) : देशाला सात टक्के कृषी विकास दर गाठायचा असेल, तर कृषी क्षेत्राची भूमिका निर्णायक ठरणार आहे. याची जाणीव ठेवत अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. भारत विस्तार, एआय एग्री टूलची अंमलबजावणी, शेतकर्‍यांना आधुनिक तंत्रज्ञानाची उपलब्धता आणि हाय व्हॅल्यू क्रॉप शेतीला प्रोत्साहन देण्याच्या घोषणा भविष्यातील शेतीसाठी दिशादर्शक ठरू शकतात, असे मत जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेडचे अध्यक्ष अशोक भंवरलाल जैन यांनी अर्थसंकल्पावर व्यक्त केली

नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे काळाची गरज
अशोक जैन म्हणाले की, बदलती हवामान परिस्थिती आणि बाजारव्यवस्थेला अनुसरून शेतीत नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे ही काळाची गरज होती आणि सरकारने त्या दिशेने पाऊल उचलल्याबद्दल स्वागत केले पाहिजे. नैसर्गिक आपत्ती आणि उत्पादनातील जोखमी लक्षात घेता पीक विमा योजनेत मूलभूत सुधारणा करणे गरजेचे होते. एकूणच अर्थसंकल्पात शेतीला भविष्योन्मुख दिशा देण्याचा प्रयत्न दिसतो. आता सरकारच्या धोरणांसोबत प्रभावी अंमलबजावणी झाली, तरच खर्‍या अर्थाने कृषी विकासाचा लाभ शेतकर्‍यांपर्यंत पोहोचेल.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !