लाडक्या बहिणींना लवकरच 2100 रुपये देणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Deputy Chief Minister Eknath Shinde will soon give Rs 2100 to his beloved sisters. कोल्हापूर (1 फेब्रुवारी 2026) : राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार ? याची प्रतीक्षा केली जात असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. लवकरच आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असल्याचे शिंदे म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापुरातील कागलमध्ये एका जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.
कुणाच्याही भावना दुखावणार नाही याची काळजी घेवू
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अभिवादन करतो. अशा दुःखात देखील आम्हाला प्रचाराला यावं लागतं. या निवडणुका लढवय्या कार्यकर्त्यांच्या असतात, त्यापुढे ढकलता येत नाहीत. आम्ही प्रचार साधेपणानं करतो, कुणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेतो, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
जनशक्तीविरोधात धनशक्तीची लढाई
कोल्हापूरच्या मातीला एक वेगळा सुगंध आहे. संजय मंडलिक तुम्ही एकटे नाहीत, ही जनता तुमच्या सोबत आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले. काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र आली आहेत. ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी आहे आणि या लढाईत नेहमी जनशक्ती जिंकते. सत्तेसाठी एकत्र आला असला तरी जनता ठरवते कुणाला आपलं मत द्यायचे, असे शिंदे म्हणाले.


