भुसावळातील द वर्ल्ड स्कूलमध्ये ‘परीक्षा पे चर्चा’
भुसावळ (2 फेब्रुवारी 2026) : शहरातील कोलते फाउंडेशन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन संचलित द वर्ल्ड स्कूलमध्ये परीक्षा पे चर्चा या विषयावर मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. शाळेच्या मुख्यध्यपिका पेट्रिश्या ह्यसेट यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत भविष्यतील वाटचालीसाठी योग्य मार्गदर्शन केले.
आगामी वार्षिक परीक्षेसाठी वेळेच्या नियोजनाचे महत्व शिकत असलेल्या विषयांचे महत्व समजावून सांगितले. विद्यार्थ्यांना शिस्तीचे व अभ्यासाच्या वेळापत्रकाचे महत्व समजावले. आपल्या क्षेत्रांतील अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. जे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरतील. या सर्व कार्यक्रमास शाळेचे पर्यवेक्षक व शिक्षकवृंद, कर्मचार्यांचे विशेष सहकार्य लाभले.


