काहूरखेडे जि.प.शाळेत संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप


Educational materials were distributed to students at Kahurkhede Zilla Parishad school on the occasion of Sant Rohidas Jayanti भुसावळ (2 फेब्रुवारी 2026) : भुसावळ तालुक्यातील काहूरखेडे जिल्हा परिषद शाळेत संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज सेवा ट्रस्ट, काहूरखेडे यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पाट्या वाटप करण्यात आल्या तसेच सर्व विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देऊन जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. संत रविदास महाराज यांच्या समता, बंधुता व मानवतेच्या विचारांचा प्रसार व्हावा तसेच विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल सकारात्मक दृष्टीकोन निर्माण व्हावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमास ट्रस्टचे पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी संत रविदास महाराज यांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !