अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा मागे घेण्यासाठी खंडणीची मागणी : किनगावच्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल


Extortion demand made to withdraw the atrocity case : Case registered against a man from Kingaon यावल (2 फेब्रुवारी 2026) : यावल तालुक्यातील किनगाव बुद्रुक ग्रामपंचायतचे माजी सरपंच यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा यावल पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून हा गुन्हा मागे घेण्यासाठी तसेच साक्षीदारांची जवाब फिरवण्यासाठी एक लाख 25 हजाराची खंडणी मागितल्याप्रकरणी किनगावातील एकाविरोधात यावल पोलिसात गुन्हा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे नेमके प्रकरण ?
किनगाव बुद्रुक, ता.यावल माजी सरपंच मिलिंद प्रभाकर चौधरी यांच्याविरुद्ध यावल पोलिसात काही दिवसापूर्वी अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान हा गुन्हा मागे घेण्यासाठी व त्यातील साक्षीदारांना त्यांचे जवाब फिरवण्यासाठी किनगाव येथील रहिवासी रामचंद्र दाजीबा पाटील यांनी एक लाख 25 हजारांची खंडणी मागितली व या संदर्भातील एक फोन त्यांनी चौधरी यांच्या एका मित्राला करून धमकी दिली, जर मला पैसे दिले नाही तर माझी माणसे अ‍ॅट्रासिटीच्या गुन्ह्यात मिलिंद चौधरीविरुद्ध साक्ष देतील आणि त्याला जेलमध्ये सडावे लागेल. सुरुवातीला त्यांनी दोन लाख रुपये मागणी केली तर तडजोडी नंतर एक लाख 25 हजार देण्याचे ठरले मात्र खंडणीसाठी वारंवार धमकी व कॉल केल्यामुळे वैतागलेल्या मिलिंद चौधरी यांनी यावल पोलिसात रामचंद्र दाजीबा पाटील यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप सूर्यवंशी करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !