वाढते अपघात रोखण्यासाठी हेल्मेट वाटून वाहनधारकांमध्ये जनजागृती


To prevent increasing accidents, helmets are being distributed and awareness is being created among motorists जळगाव (2 फेब्रुवारी 2026) : शहरातील तसेच महामार्गावरील वाढते अपघात आणि त्यात विनाहेल्मेट दुचाकीस्वारांचे प्राणाकिंत अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वाहतुकीचे नियम पाळतानाच हेल्मेटचा वापरही दुचाकीस्वारांना करावा, यासाठी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिन्यानिमित्त एनएक्सटी इन्फ्रा प्रा.लि.यांच्या वतीने वाहनधारकांना मोफत हेल्मेट वाटप करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पाळधी महामार्गचे पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद सय्यद, एनएक्सटी इन्फ्रा प्रा.लि.चे सुरक्षा अधिकारी शेख शोएब व टोल इन्सिडेंट मॅनेजमेंट टीमचे सदस्यही यावेळी उपस्थित होते.

रस्ते वापरणार्‍या नागरिकांनी हेल्मेटचा वापर करावा व रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता वाढवावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !