भुसावळ रिडर्स क्लबचा चॅप्टर फाईव्ह : शांतता भुसावळकर वाचत आहेत या बोधवाक्याखाली सलग एक तास वाचनयात्रा


भुसावळ (2 फेब्रुवारी 2026) : भुसावळ शहरात सांस्कृतिक व वैचारिक व्यासपीठ निर्माण करण्याच्या उद्देशाने स्नेहयात्री प्रतिष्ठानच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या भुसावळ रिडर्स क्लब या उपक्रमाचा पाचवा साप्ताहिक अध्याय अर्थात चॅप्टर फाइव रविवारी उत्साहात पार पडला.शांतता भुसावळकर वाचत आहेत’हे बोधवाक्य असलेल्या या उपक्रमात सर्व वयोगटातील वाचनप्रेमी सहभागी झाले होते.

13 वाचकांचा सहभाग
चॅप्टर फाईव्हमध्ये एकूण 13 वाचकांनी सहभाग नोंदवला असून त्यांनी विविध विषयांवरील 13 पुस्तकांचे सलग एक तास कोणत्याही व्यत्ययाविना वाचन केले.नैसर्गिक वातावरणात, शांततेत आणि सामूहिक वाचनाचा अनुभव घेण्याचा अनोखा उपक्रम म्हणून या रिडर्स क्लबकडे पाहिले जात आहे. परिसरातील कोणत्याही वयोगटातील वाचन व पुस्तकप्रेमी व्यक्ती स्वतःचे पुस्तक घेऊन या रिडर्स क्लबमध्ये सहभागी होऊ शकतात.चॅप्टर सिक्स पुढील रविवार, 8 रोजी सकाळी 7.45 वाजता, शहरातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात, प्रवेशानंतर डाव्या बाजूस असलेल्या वडाच्या पाराजवळ आयोजित करण्यात येणार आहे.

उपक्रमात सहभागी रिडर्स क्लबचे सदस्य आशिष जाधवानी यांनी निसर्गाच्या सान्निध्यात वाचनप्रेमी समूहासोबत पुस्तकांच्या सहवासात घालवलेला एक तास ही अद्भुत अनुभूती असते,असे सांगत भुसावळकरांनी या वाचनयात्रेत सहभागी व्हावे,असे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी स्नेहयात्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष वीरेंद्र पाटील, प्रा. डॉ. गिरीश कुलकर्णी, समीर पाटील व सुनील इंगळे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !