ऑर्डनन्स फॅक्टरी कामगार युनियनच्या वार्षिक सभेत आशिष मोरे यांची अध्यक्षपदी तर दिनेश राजगिरे महासचिवपदी
भुसावळ (2 फेब्रुवारी 2026) : भुसावळातील ऑ. फॅ. कामगार युनियनची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच कामगार भवन, युनियन कार्यालयात पार पडली. सभेच्या प्रारंभी दिवंगत सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. खजिनदार संतोष बाविस्कर यांनी सादर केलेले वार्षिक जमा-खर्च पत्रक सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
महासचिव दिनेश राजगिरे यांनी गेल्या वर्षभरातील युनियनच्या कार्याचा सविस्तर अहवाल मांडला. यावेळी कामगार कायद्यातील बदल, स्थानिक वेल्फेअरचे प्रश्न तसेच विविध प्रस्ताव मंजूर करण्यात आले.
संघटनेच्या उपविधीनुसार पुढील कार्यकाळासाठी अध्यक्षपदी आशिष मोरे, कार्याध्यक्षपदी निलेश देशमुख, मोहन सपकाळे, नितिन दत्तु पाटील, संजय लोखंडे, हितेंद्र पाटील, उपाध्यक्ष तुषार पाटील मेजर, दिनेश राजगिरे (महासचिव) यांची निवड झाली. निवडणूक प्रक्रिया प्रवीण पाटील व अरुण पाटील यांनी पाहिली.
सभासदांच्या घोषणाबाजीने परिसर दुमदुमून निघाला. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.


