!-- afp header code starts here -->

भुसावळातील शासकीय जागेवरील संतोषी माता हॉलला अखेर सील

पालिकेने घेतला ताबा : इनडोअर गेम्सऐवजी मंगल कार्यालय सुरू केल्याने प्रशासनाची कारवाई


The Santoshi Mata Hall on government land in Bhusawal has finally been sealed भुसावळ (3 फेब्रुवारी 2026) : भुसावळातील सुरभी नगर परिसरातील संतोषी माता सोसायटीच्या मंगल कार्यालयाला प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी सोमवार, 2 रोजी सील ठोकल्याने शहरात खळबळ उडाली. पालिका मालकीच्या आरक्षित शासकीय जागेवर बेकायदेशीरपणे सभागृह उभारण्यात आल्याने ही कारवाई बंदोबस्तात करण्यात आली.

अटींचे उल्लंघन करीत बांधला हॉल
भुसावळ पालिकेची विशेष सभा ठराव क्र.13, दिनांक 24 जानेवारी 2000 अन्वये नगररचना योजनेतील आरक्षण (विकास आरक्षण क्र. 88) मधील मूळ भूखंड क्रमांक 55/1 व 55/2 येथील 82 मीटर ु 37 मीटर जागा 9 वर्षांच्या कराराने इनडोअर गेम हॉल व सार्वजनिक खेळासाठी दिली होती मात्र संबंधित संस्थेने या अटींचे उल्लंघन करत खेळाच्या हॉलऐवजी तेथे मंगल कार्यालय उभारले. त्यासाठी कोणतीही कायदेशीर बांधकाम परवानगी घेतली नाही. 30 वर्षांच्या करारासाठी शासनाची मंजुरी आवश्यक असताना ती आजतागायत प्राप्त न झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी 6 डिसेंबर 2010 रोजी पालिकेने ही जागा बांधकामासह ताब्यात घेण्याचे निर्देश दिले होते.

न्यायप्रविष्ट प्रकरणात मुद्दा मांडू
एक वर्षापूर्वी आलेल्या नोटीसला उत्तर दिले होते. तीच नोटीस आता पुन्हा पुन्हा दिली, त्यालाही उत्तर दिले आहे. मुळात हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यावर स्थगिती आहे. तरीही आज अधिकार्‍यांनी कारवाई केली. ताबा घेण्याची नोटीस आम्हाला दिली नाही. यामुळे पुढे न्यायप्रविष्ट प्रकरणात हा मुद्दा मांडू. न्यायदेवतेवर विश्वास असल्याचे संतोषी माता अर्बन क्रेडीट सोसायटीचे चेअरमन वासुदेव इंगळे यांनी सांगितले.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !