!-- afp header code starts here -->

भुसावळातील एन.के.नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप


A farewell was given to the tenth-grade students at N.K. Narkhede English Medium School in Bhusawal भुसावळ (3 फेब्रुवारी 2026) :शहरातील एन.के.नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप सोमवार, 2 रोजी निरोप देण्यात आला.

यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.मकरंद नारखेडे होते. सचिव पी.व्ही.पाटील, संस्थेचे ऑनररी जॉईट सेंक्रेटरी प्रमोद नेमाडे, मुख्याध्यापिका अर्चना कोल्हे, पर्यवेक्षिका राखी बढे यांनी सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात केली. मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा
नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योत हस्तांतरीत केली. दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनाच्या आठवणींना उजाळा दिला. अध्यक्ष आणि मुख्याध्यापिका यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विविध मनोरंजनात्मक खेळ सादर केले. दहावीच्या विद्यार्थ्यांना संस्थाध्यक्ष डॉ.मकरंद एन.नारखेडे यांनी परीक्षेसाठी
विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
यशस्वीतेसाठी शाळेतील धनश्री महाजन, रुही बासीत, गजाला बासीत, प्रियंका नेहेते, वर्षा गुरुबा, नम्रता गुरव, देवयानी राणे यांचे सहकार्य लाभले.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !