!-- afp header code starts here -->

यशोशिखर गाठताना मनोधैर्य खचविणार्‍यांचा विचार करू नका : सोनू मांडे


While reaching the pinnacle of success, don’t think about those who try to break your morale: Sonu Mande भुसावळ (3 फेब्रुवारी 2026) : दहावी परीक्षेनंतर करिअरची निवड करताना तुमच्यामध्ये देवाने जे काही चांगले गुण दिले आहेत त्याचा विचार करूनच करिअर निवडा. यशोशिखर गाठताना अनेक लोक तुमचे मनोधैर्य खचवण्याचा प्रयत्न करतील परंतु तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करा. जिद्द ,मेहनत आणि प्रामाणिकपणा ची शिदोरी सदैव सोबत बाळगा असे केले तर हमखास तुम्हाला यश मिळेल, असे प्रेरणादायी विचार श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सोनु मांडे यांनी विद्यार्थिनींना सांगितले. निमित्त होते इयत्ता दहावीच्या ज्ञानज्योत आदान प्रदान व शुभेच्छा प्रदान कार्यक्रमाचे..

यांची होती उपस्थिती
संस्थेच्या अहिल्यादेवी कन्या विद्यालयात दहावीच्या मुलींचा निरोप समारंभ म्हणजेच ज्ञानज्योत आदान प्रदान कार्यक्रम मंगळवारी संस्थेच्या हॉलमध्ये झाला. यावेळी ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते व्यासपीठावर संस्थेचे सदस्य श्रीधर खणके, भागवत वानखेडे, शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी कुलकर्णी, पर्यवेक्षक संजीव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थिनींनी व्यक्त केली कृतज्ञता
शाळेला निरोप देताना अनेक विद्यार्थिनींचा कंठ दाटून आला. अंजनी विश्वकर्मा, प्राची चौधरी, जिगिशा निकम, भाग्यश्री ओगले, रिया पाटील हेमांगी पाटील इत्यादी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळेविषयीची कृतज्ञता व्यक्त केली.

यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
शिक्षक मनोगत मांडतांना प्रकाश चौधरी, संजीव पाटील यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला निरोप देताना ज्ञानज्योत आपल्या छोट्या भगिनी म्हणजेच नववीच्या विद्यार्थ्यांना अर्पण करीत असतात आणि ही ज्ञानज्योत सतत तेवत ठेवण्यासाठी प्रयत्नशील रहा अशी प्रतिज्ञा देत असतात. सूत्रसंचालन अर्चना पाटील यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय अतुल जाधव तर आभार पल्लवी पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !