पाडळसात होणार्या श्री शिवमहापुराण कथेच्या पार्श्वभूमीवर कथा मंडपाचे भूमिपूजन
In the context of the Shri Shiv Mahapurana discourse to be held in Padalsat, the groundbreaking ceremony for the discourse hall was performed यावल (4 फेब्रुवारी 2026) यावल तालुक्यातील पाडळसा येथे श्री शिवमहापुराण कथेचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी कथा मंडप भूमिपूजन व ध्वजारोहण कार्यक्रम झाला. पंडित श्री.प्रदीपजी मिश्रा यांच्या अमृतवाणीतून येथे श्री शिवमहापुराण कथा सादर होणार आहे.
कथेची जय्यत तयारी
पाडळसा, ता.यावल येथे पुढील महिन्यात होणार्या श्री शिवमहापुराण कथेच्या पावन पर्वाची जय्यत तयारी सुरू आहे. परमपूज्य पंडित श्री प्रदीपजी मिश्रा (सिहोरवाले) यांच्या अमृतवाणीतून होणार्या या दिव्य कथेच्या पार्श्वभूमीवर कथेच्या जागेचे विधीवत भुमिपूजन व ध्वजारोहण अत्यंत भक्तिभावपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

हा मंगल सोहळा परमपूज्य श्रध्देय महामंडलेश्वर 1008 श्री पवनकुमार दासजी महाराज (श्री खंडोबावाडी देवस्थान, फैजपूर) यांच्या शुभहस्ते पार पडला. आमदार अमोल जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत एनएसयुआयचे राज्य चिटणीस धनंजय चौधरी यांनी नारळ वाढले.
शिवभक्तांच्या उपस्थितीने हर हर महादेवाच्या गजराने आणि आध्यात्मिक ऊर्जेने संपूर्ण परिसर पावन झाला. शिवधर्म,संस्कार आणि भक्तीची प्रेरणा देणारी ही शिवमहापुराण कथा समाजाला नवी दिशा देणारी ठरणार आहे. या पावन आणि ऐतिहासिक सोहळ्याची सध्या जय्यत तयारी सुरू आहे.त या श्री शिवमहापुराण कथेचा लाभ सर्व शिवभक्तांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.







