जीवनाच्या पुस्तकाचे पुढचे पान उलटवायचे की पुस्तक बंद करायचे तुमच्या हातात : कवी दिनेश चव्हाण
गिरणा विद्या प्रसारक मंडळाचे हायस्कुलमध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप
Whether to turn to the next page of the book of life or to close the book is in your hands: Poet Dinesh Chavan चाळीसगाव(4 फेब्रुवारी 2026) : मेहुणबारे येथील गिरणा विद्या प्रसारक मंडळाचे हायस्कूलमध्ये इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच पार पडला. विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी प्रमुख अतिथी म्हणून चाळीसगाव येथील चित्रकार कवी दिनेश चव्हाण होते. आई, वडील, गुरू यांचे आपल्या जीवनात, जीवनाला आकार देण्यात मोलाचा वाटा असतो. जीवनाची प्रत्येक परीक्षा ते देत असतात, लहान मुलापासून ते अंतिम श्वासापर्यंत जीवनाची परीक्षा ही सुरूच असते, काही परीक्षा प्रमाणपत्र देणार्या असतात तर काही शाबासकी तर काही मनाला आनंद, जीवनात सकारात्मक विचारांना प्राधान्य द्या, असे चव्हाण म्हणाले.
यांची होती उपस्थिती
यावेळी प्रसिद्ध विचारवंत व स्तंभलेखन, विद्रोही कवी साहेबराव मोरे देखील उपस्थित होते. त्यांनीही आपले विचार मांडताना, जगात सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून ओळखले जाणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर संघर्षातून कसे विद्वान झाले हे सांगताना काही उदाहरण दाखले दिले.

यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय शिक्षण सभापती बाळासाहेब देशमुख, उपाध्यक्ष आप्पासाहेब महाजन, प्राचार्या श्रीमती छाया बैसाने, उपप्राचार्य बी.एच.चव्हाण, पर्यवेक्षक एम.एस.पारेराव उपस्थित होते. यावेळी काही विद्यार्थिनींनी मनोगत व शिक्षिकांनी आपले मार्गदर्शनपर मौलिक विचार मांडले. विद्यार्थ्यांनी यावेळी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन सीमा शेवरे यांनी केले.







