!-- afp header code starts here -->

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगेंची गोळ्या घालून हत्येची धमकी

चौकशीची मागणी ; वाल्मीक कराड समर्थकाचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल


Maratha community leader Manoj Jarange receives death threat via shooting जालना (4 फेब्रुवारी 2026) : मराठा समाजाचे नेते  मनोज जरांगे पाटील यांची गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी मिळाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. धमकी देणारा व्यक्ती वाल्मीक कराड समर्थक असल्याचा दावा केला जात आहे.

सोशल मिडीयात क्लीप व्हायरल
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर रान पेटवले होते. या प्रकरणी त्यांनी संतोष देशमुख हत्याकांडाचा मुद्दाही लावून धरला होता. या प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा उजवा हात मानल्या जाणार्‍या वाल्मीक कराडला अटक झाली. त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. या घटनाक्रमामु्ळे धनंजय मुंडे व मनोज जरांगे यांच्यातील राजकीय वितुष्ट वाढले आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांना फोनवरून कथित धमकी देण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे यांना गोळ्या घालण्याची धमकी देणारी एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल आहे.

सदर कॉल रेकॉर्डिंगमध्ये एक व्यक्ती समोरच्या व्यक्तीशी संवाद साधताना थेट मनोज जरांगेंना गोळ्या घालून ठार मारण्याची भाषा करताना दिसून येत आहे. विशेषतः हा व्यक्ती पुन्हा धनंजय मुंडे व वाल्मीक कराड म्हणायचे नाही, अन्यथा तुलाही जीवे मारतो अशी धमकीही सदर व्यक्तीला देताना ऐकू येत आहे.

काही दिवसांपूर्वीच मुंडेंवर झाले होते आरोप
या ऑडिओ क्लिपमध्ये धनंजय मुंडे व वाल्मीक कराड यांचे नाव घेऊन धमकावण्यात येत असल्याचेही निदर्शनास येत आहे. तुझ्या …. जर गोळ्या घातल्या नाही, तर मुंडे व वाल्मीक कराड पुन्हा म्हणायचे नाही, असेही हा धमकी देणारा व्यक्ती म्हणताना ऐकू येत आहे. या ऑडिओ क्लिपमुळे मराठा समाजात एकच खळबळ माजली आहे.

ऑडिओ क्लिपमधील या दोन व्यक्ती कोण? असा सवालही या प्रकरणी केला जात आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे मनोज जरांगे यांनी काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांच्यावर आपली सुपारी दिल्याचे गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी काही जणांना अटकही करण्यात आली होती.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !