!-- afp header code starts here -->

दुचाकींच्या भीषण अपघातात रावेर तालुक्यातील दोघे तरुण ठार


Two young men from Raver taluka were killed in a horrific motorcycle accident रावेर (4 फेब्रुवारी 2026) : दोन दुचाकी समोरा-समोर जोरदार धडकल्याने झालेल्या अपघातात रावेर तालुक्यातील दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला. हा अपघात रावेर शहराजवळ बुधवारी घडला.

अनियंत्रीत दुचाकी समोरा-समोर धडकल्या
मिळालेल्या माहितीनुसार, रावेर शहराजवळील बिजासनी माता मंदिराजवळ बुधवारी दुपारी विनय भालेराव (26, कोळदा, ता.रावेर) हा तरुण दुचाकीवरून रावेरच्या दिशेने येत होता तर त्याचवेळी शुभम लोखंडे (20, विवरे) हा तरुण रावेरहून विवरेकडे जात असताना दोघांच्या दुचाकी समोरासमोर जोरदार धडकल्या. धडक इतकी भीषण होती की शुभम लोखंडे याचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी विनय भालेराव याला तातडीने उपचारासाठी भुसावळ येथे हलविण्यात येत असतानाच रस्त्यात त्याचादेखील मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

स्थानिकांची मदतीसाठी धाव
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच रावेर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मृतदेह रावेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !