!-- afp header code starts here -->

वनविभागासह पोलिस दलात नोकरीच्या आमिषाने सहा लाखांचा गंडा : चाळीसगावच्या तरुणाविरोधात गुन्हा


Six lakh rupees swindled with the promise of jobs in the forest department and police force: Case registered against a young man from Chalisgaon चाळीसगाव (4 फेब्रुवारी 2026) : पोलिस दलासह वनविभागात सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत चाळीसगाव तालुक्यातील तीन तरुणांची तब्बल सहा लाखांत फसवणूक करण्यात आली. चाळीसगावच्या तरुणाविरोधात शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे फसवणूक प्रकरण
तक्रारदार घनश्याम कैलास पाटील  30, रा.हिंगोणे खुर्द, ता. चाळीसगाव) हे मोबाईल शॉप चालवतात. संशयित कुणाल भगवान डांगर (रा.छत्रपती संभाजीनगर, हल्ली मुक्काम टाकळी प्र.चा.) याने फिर्यादी घनश्याम पाटील, दीपक गोपीचंद चव्हाण आणि हर्षल दिलीप चव्हाण या तिघांना विश्वासात घेत आपली पोलिस खाते आणि वनविभागात चांगली ओळख असून, मी तुम्हाला तिथे नोकरी लावून देऊ शकतो’, असे आमिष दाखवत प्रत्येक तरुणाकडून दोन लाख उकळले.

ही रक्कम चाळीसगाव शहरातील गणेश कॉम्प्लेक्समधील देवांश मोबाईल शॉपवर आणि बँक ऑफ इंडियाजवळ 7 जून ते 25 ऑक्टोबर 2024 या कालावधीत देण्यात आली मात्र पैसे देऊनही नोकरी मिळत नसल्याने आणि आरोपी टाळाटाळ करत असल्याने आपली फसवणूक झाल्याचे तरुणांच्या लक्षात आले.

अखेर घनश्याम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर करत आहेत.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !