!-- afp header code starts here -->

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवारांची निवड निश्चित !


Sunetra Pawar’s election as the national president of the NCP is confirmed मुंबई (5 फेब्रुवारी 2026) : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवीदी अजित पवात गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील पदाधिकारी आणि राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांच्या सहमतीने हा निर्णय होईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

चर्चेला अधिकच जोर
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर 31 जानेवारी रोजी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार, शपथविधीपूर्वी त्यांनी पवार कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांना भेटून त्यांना माहिती दिली होती. अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनेत्रा पवार यांना सांत्वनपर दूरध्वनी केल्याची माहितीही समोर आली आहे. या सर्व घडामोडींमुळे सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्ष नेतृत्वाची जबाबदारी येण्याची चर्चा अधिकच जोर धरू लागली आहे.

लवकरच दिल्लीत घेणार मोदींची भेट
भविष्यातील निर्णय सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते घेतील, असे पक्षातील उच्चपदस्थ सूत्रांचे म्हणणे आहे. सुनेत्रा पवार लवकरच दिल्लीत जाऊन नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या भेटीनंतर पक्षाच्या पुढील राजकीय धोरणाबाबत स्पष्टता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीसह एकत्रीकरणाच्या चर्चांनाही नवे वळण मिळू शकते.

पक्षातील अनेक आमदारांनी सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्त करण्याची मागणी पुढे आणली आहे. या मागणीला आता प्रमुख पदाधिकार्‍यांचा पाठिंबा मिळत असल्याची माहिती मिळते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली 30 हून अधिक प्रमुख पदाधिकार्‍यांनी यासंदर्भात पत्र पाठवले आहे. हे पत्र सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्याकडे पाठवण्यात आले आहे.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !