जळगावहून इंदौरसाठी एप्रिलपासून विमान सेवा सुरू होणार !
Air service from Jalgaon to Indore will start from April! जळगाव (5 फेब्रुवारी 2026) : आगामी एप्रिल महिन्यापासून जळगावहून थेट इंदौरसाठी विमान सेवा सुरू होण्याचे संकेत आहेत. ‘फ्लाय 91’ कंपनीने त्यांच्या संकेतस्थळावर जळगाव-इंदूर विमानसेवा लवकरच सुरु होत असल्याचे जाहीर केले आहे. कंपनीकडे सध्या सहा एअरक्रॉफ्ट आहेत. कंपनीतर्फे आणखी तीन नवीन फ्रान्समधून 10 फेब्रुवारीपर्यंत येणार होते. ते आता 20 ते 25 तारखेच्या पुढे भारतात दाखल होणार आहेत.
भोपाळमार्गे रेल्वेने सुमारे 8 तास
जळगाव ते इंदूर शहराचे अंतर सुमारे 275 किलोमीटर आहे. त्यासाठी रेल्वेने भोपाळमार्गे गेल्यास आठ ते 10 तास, बसने 7 ते 8 तास तर कार किंवा टॅक्सीने 5 ते 6 तासांचा अवधी लागतो. त्या तुलनेत विमानाने अवघ्या सव्वा ते दीड तासात जळगावहून इंदूरला पोहचता येईल. ही सेवा व्यावसायिक झाल्यास किमान 2500 रुपयांवर एका सीटचे तिकीट असेल.

व्यावसायिक असेल विमानसेवा
जळगावातून गोवा, पुणे, अहमदाबाद, मुंबई, हैदराबाद या पाच शहरात आरसीएसअंतर्गत (रिजनल कनेक्टीव्ही सर्व्हीस ) विमानसेवा सुरू आहे. नव्याने सुरु होणारी जळगाव-इंदूरसेवा मात्र व्यावसायिक तत्वावर असण्याची शक्यता आहे.







