भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात मुख्याध्यापकांसह कर्मचार्यांना सेवानिवृत्तीनिमित्त निरोप
At K. Narkhede School in Bhusawal, the principal and staff members were given a farewell on the occasion of their retirement भुसावळ (5 फेब्रुवारी 2026) : शहरातील के.नारखेडे विद्यालयात मंगळवार, 3 रोजी विद्यालयाचे मुख्याध्यापक वाय.एन.झोपे, एन.बी. किरंगे तसेच शिपाई डी.पी.सोनवणे यांना सेवानिवृत्तीनिमित्त निरोप देण्यात आला.
यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.मकरंद नारखेडे होते. प्रमुख अतिथी म्हणून पी.व्ही.पाटील होते. व्यासपीठावर ऑनररी जॉईन्ट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, संस्था सदस्य विकास पाचपांडे, शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष भागवत पाटील, सत्कार मूर्ती एन.बी.किरंगे, वाय.एन.झोपे, डी.पी.सोनवणे सपत्नीक उपस्थित होते.

शाळेच्या मुख्याध्यापिका एस.ए.अडकमोल, पर्यवेक्षक एस.पी.पाठक व एस.एल.राणे, संगणक विभाग प्रमुख बी.ए.पाटील, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, एन.के.नारखेडे विद्यालयाच्या पर्यवेक्षिका राखी बढे उपस्थित होत्या. प्रास्ताविक मुख्याध्यापिका एस.ए.अडकमोल यांनी केले.
डॉ.मकरंद नारखेडे, पी.व्ही.पाटील, ऑ.जॉ.सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, भागवत पाटील, एस.एल.राणे, एस.पी.पाठक, राखी बढे तसेच सर्व मान्यवरांच्या हस्ते एन.बी.किरंगे, वाय.एन.झोपे, डी.पी सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षांचा परिचय रीता महाजन यांनी तर प्रमुख अतिथींचा परिचय स्वाती इखे यांनी दिला.
एन.बी किरंगे, वाय.एन.झोपे यांनी मुख्याध्यापक म्हणून शाळेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे योगदान दिले, तर डी.पी.सोनवणे यांनी निष्ठेने सेवा बजावून सर्वांची मने जिंकली. शिक्षकांमधून प्रातिनिधीक स्वरूपात एस.टी चौधरी, एम.व्ही.कुलकर्णी, एस.पी.महाजन यांनी सत्कारमूर्तींविषयी मनोगत व्यक्त केले.
डॉ.मकरंद नारखेडे यांनी अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सत्कारमूर्तीच्या कार्याचा गौरव करत शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन के.एस.राणे यांनी तर आभार पर्यवेक्षक एस.पी.पाठक यांनी मानले. शैलेंद्र वासकर, दिनकर हेलोडे, मनोज तडवी, नितीन पाटील, एस.एम.चिपळोणकर, विशाल राणे, संदीप पाटील, माधव गरुडे, निलेश नेहेते, जी.व्ही.पाटील, विलास पाटील, एन.जे.खाचणे यांनी परिश्रम घेतले.







